हडपसर मतदार संघातील प्रभाग क्र 26 मध्ये 93 कोटींच्या विविध विकास कामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न..!!
संतसृष्टीच्या माध्यमातून हडपसर नगरीमध्ये साक्षात विठ्ठल अवतरले..!
हडपसर मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २६ मधील ९३ कोटी रुपयांच्या निधीतून विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा मंत्री व शिवसेना पुणे जिल्हा संपर्क मंत्री उदय सामंत साहेब आणि रोहयो कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
हडपसर विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात आणि आपल्या माध्यमातून विविध विकासकामांना गती मिळाली असून हडपसर मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २६ मधील ९३ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यामध्ये कै. दत्तोबा उर्फ आप्पा शंकरराव तरवडे संतसृष्टीतील २१ फुटी विठ्ठलाच्या भव्य मूर्तीचे आणि संतसृष्टीचे लोकार्पण, बाल उद्यान, कौसरबाग कोंढवा हडपसर येथील स्केटिंग ग्राउंड, महात्मा जोतिराव फुले जलतरण तलाव, कड नगर ते हांडेवाडी पीपीपी तत्वावर सुरू असलेल्या कामाचे लोकार्पण याचा समावेश आहे. संतसृष्टी ही विशेषतः पालखी मार्गामध्ये निर्माण केली असून 21 फूट उंचीची विठ्ठलाची मूर्ती ही पंढरीला निघालेल्या वारकऱ्यांसाठी मार्गामध्ये आशीर्वाद रुपी विठ्ठलाचे दर्शन घेण्याचा लाभ वारकऱ्यांना होईल. या भव्य दिव्य विठ्ठलाचे रूप बघून प्रत्येक वारकरी विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक झाल्याशिवाय पंढरपूरला जाणार नाही एवढं मात्र निश्चितच.
उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात पुणे शहरात अनेक विकासात्मक बदल घडवून आणले. यासह हडपसर मतदारसंघासाठी देखील भरघोस निधींची तरतूद करून पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी कायम पुढाकार घेतला आहे. सार्वजनिक जीवनात काम करत असताना लोकहिताला अधिकाधिक प्राधान्य देऊन कार्यरत राहत आहे. पीपीपी मत्त्वावर करण्यात आलेल्या बायपास मुळे हडपसर मतदारसंघातील लाखो नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार असून प्रवासाचा वेळ वाचणार आहे. जनतेच हित लक्षात घेऊनच नागरिकांना लागणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणं हे आपलं कर्तव्य आहे तसेच यापुढील काळात नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास उपस्थितांना दिला.
यावेळी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे पाटील, धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे श्री. अक्षय महाराज भोसले, जिल्हाप्रमुख उल्हास भाऊ तुपे, रमेश बापू कोंडे,युवासेना सचिव किरण साळी यांच्यासह महायुतीचे असंख्य पदाधिकारी, स्थानिक नागरिक व चिमुकले वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.