एकच ध्यास, हडपसर मतदारसंघाचा विकास..
गणेश नगर गल्ली नंबर 3, महंम्मदवाडी येथे अंतर्गत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ..!
महायुती सरकार स्थापन झाल्यापासून माजी मुख्यमंत्री,तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून हडपसर मतदार संघात विविध ठिकाणी विकासकामांना गती प्राप्त झाली. नागरिकांना मूलभूत आणि पायभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात विकास निधीची तरतूद झाली व विकास कामांना गती आली. हडपसर मतदारसंघातील गणेश नगर गल्ली नंबर 3 येथे सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी नागरिकांशी संवाद साधत आभार मानले.
हडपसर मतदार संघात होत असलेली विकासकामे व कामांची गती पाहून जनतेत समाधानाचा सुर असल्याने याचा निश्चितच आनंद आहे. जनसेवा हेच आद्यकर्तव्य असून यासाठी आपण सदैव कटीबद्ध आहोत, जनहित जोपासत विकासकामे करण्यासाठी कायम प्रयत्नशील आहे.
याप्रसंगी शिवाजी लक्ष्मण शिंदे, आनंद घुले, मधुकर देसाई, शेख काका, चित्राताई साळुंखे, वाघापूरे ताई, गायकवाड ताई, गणवीर ताई , आशाताई यादव, शैलेश शेलार, नाना तरवडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.